‘दंगल’ मध्ये बबिताची लहानपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचा २ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर सुहानी भटनागरच्या कुंटूंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आमिर खान पुढे सरसावला आहे. आज आमिरने सुहानीच्या कुंटूंबीयांना भेट दिली. सुहानीने अवघ्या 19 वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
सुहानीच्या कुंटूंबीयांना भेट दिल्याचे आमिर खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात सुहानीच्या आई-वडिलांसोबतचा फोटो फोटोमध्ये सर्वजण सुहानीच्या फोटोसोबत उभे आहेत. आमिरने एका हाताने सुहानीचा फोटो पकडला आहे. सुहानी डर्माटोमायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त होती. या आजारामुळे तिच्या संपूर्ण अंगावर सूज आली होती. हा संसर्ग इतका वाढला होता की तिच्या फुफ्फुसात पाणी भरले होते. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
आमिर सुहानीच्या संपर्कात होता
सुहानीच्या आईने एका मुलाखतीत सांगितले होते की, आमिर खान तिच्या संपर्कात होता पण तिने सुहानीच्या आजाराबद्दल अभिनेत्याला सांगितले नव्हते. आम्ही त्याला कोणताही मेसेज केला तर तो लगेच त्याला रिप्लाय द्यायचा आणि कॉलही करायचा. आमिर खानचा दंगल चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिरसोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जायरा वसीम, साक्षी तन्वर आणि अपारशक्ती खुराना महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले होते.