मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची शुटींग चालू असलेल्या अंधेरी पश्चिम येथील चित्रकूट स्टुडिओला शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम भागात असलेल्या चित्रकुट स्टुडिओला शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्यानंतर लगेच अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. अग्निशामक दलाच्या जावांनी तब्बल सहा तासाच्या अथांग प्रयत्नानंतर आग विझविण्यात रात्री साडेदहाला यश आले आहे. परंतु, या आगीत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याची माहिती कूपर रुग्णालयाचे डॉक्टर सदाफुले यांनी दिली.
दरम्यान, रणबीर आणि श्रद्धाच्या आगामी चित्रपटाचे गाणे शूट करण्यासाठी सेट बनवण्यात आला होता. त्यामुळे आता आठवडाभरानंतर हे गाणं शूट केलं जाणार आहे. लव रंजनच्या या अनटाइटल्ड चित्रपटात श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु शूट आणि त्याच्या सेटमधील अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दिसत आहे.