राहुलकुमार अवचट
Yavat News : (पुणे) : दहिटणे येथे जिल्हा परिषद शाळातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी “सकारात्मक पालकत्व” या विषयावर इंटलेट एज्युकेशन सर्विसेस कंपनीच्या वतीने मार्गदर्शन व्याख्यान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(Yavat News)
सकारात्मक पालकत्व या विषयाचे मार्गदर्शन केले.
यावेळी आम्रपाली धेंडे यांनी सर्व पालकांना उदाहरण देऊन सर्व विषय उत्कृष्ट आणि पालकांना समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगितले, कोविड काळात ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केला गेला त्यामुळे प्रत्येक घरात स्मार्ट फोन घ्यावेच लागले आणि त्यामुळे पहिलीच्या मुलापासून सर्वजण मोबाईल फोन वर आले आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की मुले अभ्यास कमी आणि मोबाईल मधील इतर गोष्टींकडे जास्त आकर्षित झाली, त्यामुळे आता पालकांची डोकेदुखी वाढली असून हीच डोकेदुखी कमी कशी करता येईल याविषयी योग्य मार्गदर्शन केले.(Yavat News)
लहान मुलांना, या वयात वेगवेगळे ताण येतात, मुलांना मोबाईल व टीव्हीचे व्यसन जडत असून मुलांवर संस्काराचा आभाव दिसत आहे या सर्व बाबी विचारात घेऊन, मुलांवर येणारे वेगवेगळे ताण पालकांनी कसे ओळखायचे? ताणाची लक्षणे, येणारा ताण कसा कमी करायचा? मोबाईल व्यसन कसे सोडवायचे?(Yavat News) या बाबतचे सकारात्मक पालकत्व या विषयाचे मार्गदर्शन केले इंटलेट एज्युकेशन सर्विसेस कंपनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.(Yavat News)
दरम्यान, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेखा खेडेकर, शिक्षक विकास लवांडे, यशवंत शिंदे, पद्माकर धेंडे, प्रमोद थोरात, गिता थोरात आदी शिक्षक यांसह पालकांनी आम्रपाली धेंडे व कंपनीचे आभार मानले. यावेळी संरपच आरती गायकवाड, संदिप पेटकर, पोलीस पाटील नवनाथ धुमाळ, चेतन ढमढेरे, बापू चोरमले, दिपक मेटे, दादासाहेब कोळपे यांसह ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, महिला- पुरुष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.