राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत येथील माणकोबावाडी येथील शाळेत आज माणकोबावाडी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेतील शिक्षक सुरेश मेमाणे व शिक्षिका लिलाबाई खेडेकर यांची बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ व शाळेत नवीन रुजू झालेले शिक्षक लांडगे व साळवे यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला.(Yavat News)
एक आदर्श शाळा म्हणून.
गेली 17 वर्ष ज्यांनी या शाळेत अविरत सेवा करून उघड्या माळावरील शाळेला आयएसओ मानांकन मिळवून दिले असे हे शिक्षक सुरेश मेमाणे व लिलाबाई खेडेकर हे 17 वर्षापूर्वी येथील शाळेत आले तेव्हा ही शाळा फक्त एका खडकावर दोन खोल्यांच्या स्वरुपात उन्हाच्या झळा सोसत उभी होती. परंतु हे शिक्षक जेव्हा येथे आले तेव्हा त्यांनी या शाळेचा कायापालट करण्याचा मानस मनात पक्का करून शिक्षणाबरोबर पर्यावरण व सुशोभिकरण ही गोष्ट मनात ठेवून येथे झाडे लावण्याचा प्रयत्न केला.(Yavat News)
एक-एक झाड करत येथे असंख्य झाडे मोठी करून एक हरित शाळा निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी साकार करत मुलांच्या शिक्षणाची प्रगती यामध्ये कसूर न ठेवता पहिली ते चौथीपर्यंतची मुले इंग्रजी-मराठी वाचन, गणित, पाढे यामध्ये अव्वल ठरावी अशी गुणवत्ता त्यांच्या अंगी निर्माण केली.(Yavat News)
आज शाळेची गुणवत्ता, नैसर्गिक शुशोभीकरण, डिजिटल शाळा, रंगीत भिंत, शाळेची नवी इमारत, पाण्याची सोय, कार्यक्रमासाठी व्यासपीठ अशा एक ना अनेक संकल्पना राबवून शाळेचा सर्वांगीण विकास माणकोबावाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने या शिक्षकांनी घडवून आणला. एक आदर्श शाळा म्हणून आज या शाळेचा नावलौकिक पंचक्रोशीत होत आहे. याचे सर्व श्रेय येथील ग्रामस्थ या शिक्षक दाम्पत्यांना देत असून, आजच्या या निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समिती व माणकोबावाडी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षक सुरेश मेमाणे व लिलाबाई खेडेकर या दाम्पत्याचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक साळवे व लांडगे यांचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.(Yavat News)
यावेळी राहुल बिचकुले, पोपट लकडे, सोमनाथ खुपसे, मनोहर खताळ आदींनी मनोगत व्यक्त केले. तर सुरेश मेमाणे यांनी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासह उपस्थित ग्रामस्थ भावूक झाले.(Yavat News)
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर खताळ, सामाजिक कार्यकर्ते मारुती बिचकुले, धुळा भिसे, मल्हारी बिचकुले, सतीश लकडे, दिपक दोरगे, लहू लकडे, सुभाष बिचकुले, संपत भिसे, राजु बिचकुले, आंबूराव कोळपे, प्रकाश भिसे, दत्तात्रय पिंगळे, बाप्पू लकडे, संदीप शिंदे व माणकोबावाडी ग्रामस्थ व विद्यार्थी हे उपस्थित होते.(Yavat News)