Uruli Kanchan उरुळी कांचन, (पुणे) : भारती विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इंग्रजी विषयाच्या बाह्य परीक्षा स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेतील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका राऊत यांनी दिली.
श्रद्धा शिवाजी इनामे असे या मुलीचे नाव आहे.
१४२ विद्यार्थी सहभागी..!
भारती विद्यापीठातर्फे १२ फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवीतील एकूण १४२ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये श्रद्धा इनामे हिने १०० पैकी ९९ गुण प्राप्त करून इंग्रजी ऐंट्रन्स परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच या परीक्षेचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.
दरम्यान, या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या इंग्रजी विषय शिक्षकांचे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कांचन, सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका राऊत यांनी अभिनंदन केले.