(Uruli Kanchan) लोणी काळभोर : उरुळी कांचन येथे प्रभु श्रीराम यांच्या जयंतीनिमित्त उरुळी कांचन (ता. हवेली) येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. महाराजा प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
चित्रकला स्पर्धा पार..!
महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये चित्रकला स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, सोरतापवाडीसह परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या स्पर्धेत ६ ते १४ वयोगटातील लहान गट आणि १५ ते २१ वयोगटातील मोठा गट असे दोन गट करण्यात आले होते.
लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श गाव, माझी शाळा, माझा आवडता खेळ, निसर्ग चित्र काढायचे होते. तर मोठ्या गटासाठी झाडे लावा झाडे जगवा, जगाचा पोशिंदा शेतकरी, इतिहासातील एक प्रसंग आणि कोरोना महामारी यापैकी एक चित्र काढायचे होते. या स्पर्धेत ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
दरम्यान, उरुळी कांचन येथील महाराजा प्रतिष्ठानने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर स्पर्धा सुरू असताना सर्व विद्यार्थ्यांना शिस्तीत, कचरा करू न देता, सुंदर चित्रे काढण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रोत्साहित केले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित सतिश कांचन, भाजपाच्या राज्य पदाधिकारी सारिका लोणारी, जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, क्षेत्रिय रेल्वे समिती सदस्य अजिंक्य कांचन, युवती उपाध्यक्ष पुजा सणस, झोपडपट्टी संघाचे अध्यक्ष आबासाहेब चव्हाण, हवेली तालुका उपाध्यक्ष खुशाल कुंजीर, अक्षय कांचन, सचिन कुंभार, सुनील तुपे, काजल खोमणे, मानसी भुजबळ, सचिन शेलार, गणेश घाडगे, विकी कांचन, प्रथमेश कांचन, आनंद बोरकर, सचिन बारबोले, अभिषेक दारवटकर, अमित तुपे, निलेश कदम, गणेश मेमाणे, गणेश कांबळे, केदार जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते