पुणे : कंम्बाईन डिफेन्स सर्विसेस म्हणजेच (UPSC Combine Defence Services Exam 2) या परिक्षेचा अंतीम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना नौदल, वायुदल आणि भारतीय आर्मी यांत नोकरीची संधी मिळणार आहे.
UPSC CDS अंतीम परिक्षेच्या (Exam Final Result) निकालाची वाट बघत असणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. UPSC CDS परिक्षा देणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असली तरी UPSC Combine Defence Services Exam 2 यांत एकूण 214 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
दरवर्षी इंडियन मिलिटरी अकादमी (Indian Military Academy), ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (Officers Training Academy), इंडियन नेव्हल अकादमी (Indian Navy Academy) आणि इंडियन एअर फोर्स (Indian Air Force) अकादमीमध्ये कमिशन्ड ऑफिसर्सच्या भरतीसाठी युनियन लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा घेतली जाते.
परिक्षा दिलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर (Website) निकाल पाहू शकतात. पुढील दोन आठवड्यात उमेदवारांचे प्राप्त गुण उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.
दरवर्षी देशातील हजारो उमेदवार CDS परिक्षा देतात. या परिक्षेच्या माध्यमातून नौदल (Indian Navy), वायुदल (Indian Air Force) आणि भारतीय आर्मी (Indian Army) ऑफिसर्सच्या (Officers) रिक्त पदांसाठी पदभरती होतात.