Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी उद्या शेवटची संधी; सायंकाळी सहा वाजेपर्यंतच प्रवेशाची मुदत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 6 July 2025, 22:53

पुणे: इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणींमुळे झालेल्या विलंबाचा परिणाम प्रत्यक्ष प्रवेशांवरही दिसून येत आहे. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी सोमवारी (ता. ८ जुलै) सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत असताना, रविवारी (ता. ७ जुलै) सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

 

यंदा राज्य मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर केला होता. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियाही वेळेत पूर्ण होईल, अशी सर्वसामान्य अपेक्षा होती. मात्र यंदा राज्यभर प्रथमच संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्यामुळे विविध तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला अडथळे आले.

शेवटी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने २८ जून रोजी पहिल्या फेरीची निवडयादी प्रसिद्ध केली. या फेरीत एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून त्यापैकी तब्बल ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. मात्र, रविवारी सायंकाळी सातपर्यंत फक्त ३ लाख ८२ हजार १५४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. यावरून पहिल्या फेरीतील ६० टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश पूर्ण केल्याचे स्पष्ट होते.

राज्यभरात एकूण ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी १३ लाख ६६ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत राखीव जागा व केंद्रीभूत प्रवेश मिळून एकूण ४ लाख ५७ हजार ३९ विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत. यामध्ये ७४ हजार ८८५ विद्यार्थी कोट्यातून प्रवेश घेतल्याची नोंद आहे.

पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी मुदत सोमवारी सायंकाळी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Two people were brutally beaten up over an old dispute in Kadamwak settlement; Four people were charged and two were immediately arrested

Loni Kalbhor Police News : रात्रीच्या ‘ऑल आऊट’ मोहिमेत मोठी कारवाई! रिक्षातून फिरणारे दोघे कोयत्यांसह जेरबंद

Tuesday, 5 May 2026, 18:10
Accident

Loni Kalbhor News : सोलापूर-पुणे महामार्गावर हिट-अँड-रनची धक्कादायक घटना! कामावरून घरी जाताना कामगाराला भरधाव कारची धडक; चालक फरार

Tuesday, 5 May 2026, 17:48

Good News : मोबाईल हरवला… पण 20 मिनिटांत परत! चंदननगर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा आनंद गगनात

Tuesday, 5 May 2026, 17:35
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Theur News : थेऊर येथे पेट्रोल टँकरची कारला जोरदार धडक; महिला व चिमुकला गंभीर जखमी

Tuesday, 5 May 2026, 17:25

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54
Next Post

सिंह, मिथुन, वृश्चिक या राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, तर धनु, तुळ, मकर या राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.