अजित जगताप
सातारा : खटाव तालुक्यातील वडूज येथील छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब जोतीराम गोडसे महाविद्यालयाची रौप्यमहोत्सवी वाटचाल विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. यंदाच्या वर्षी शिक्षण संस्थेस एम. कॉम .शिक्षणास मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वी राज गोडसे यांनी दिली
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना विविध उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयाने केले आहे. सदरउपक्रमांमध्ये विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणीसाठी पूरक असे कार्यक्रम आयोजित होतआहेत. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, संवाद कौशल्य, काव्यवाचन, वादविवाद,रांगोळी, भित्तिपत्रक, देशभक्तिपर गायन, पारंपारिक वेशभूषा आदि स्पर्धा व या बरोबर विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा शिक्षक-पालक योजना राबविण्यात आली आहे.
संस्था व महाविद्यालयाने विद्यार्थ्यासाठी दिलेल्या सोयी सुविधा प्रशस्त इमारती, वर्गखोल्या, मैदान, आधुनिक व प्रशस्त प्रयोगशाळा प्रायोगिक साहित्याने युक्त विज्ञान शाखा, भव्य व साहित्य संपदेने युक्त ग्रंथालय, सुसज्ज अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग, सुसज्ज जिम व खेळ साहित्य पदव्युत्तर वाणिज्य शाखा (M.Com.) प्रारंभ २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शासन व विद्यापीठ मान्यतेने केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः शैक्षणिक ऊंची वाढवावी,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब जोतीराम गोडसे (आण्णा), मा. प्राचार्य सी. आर.गोडसे याव्यक्ष मा. पृथ्वीराज गोडसे, सचिव मा. व्ही. आर.गोडसे, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील यांनी केले आहे.
दुष्काळी भागातील विद्यार्थी यांना शिक्षण मिळावे यासाठी१९६९ साली वडूज येथे शिक्षण संस्थेने रोपटं लावले, पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेताना तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.याची माहिती देताना प्रा सी. आर. गोडसे म्हणाले, शिक्षण संस्थेची प्रगती व विकास करण्यासाठी आदरणीय दादासाहेब गोडसे,पृथ्वीराज गोडसे यांचे योगदान मोठे आहे.
बी सी ए,बी बी ए शिक्षणासाठी वीस लाख रुपयांचे पॅकेज मिळते, तासिका तत्वावर पाच हजार प्राचार्य काम करीत आहेत. त्यांना कायस्वरूपी सेवेत रुजू केले जात नाही. तर दुसऱ्या बाजूलाआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.अशी अपेक्षा आहे.इमारती, वाचनालय झाले, कला, वाणिज्य, सायन्स सोबत उच्च पदवी प्राप्त करण्यासाठी आता अनुदान नसतानाही शिक्षण दयावे लागत आहे. तांत्रिक ज्ञान घेण्यासाठी शुल्क भरून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुलांना मार्गदर्शन मिळाले तर येथील मुले प्रशासकीय सेवेत रुजू होतील.
यावेळी प्रा सुरज धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले व डॉ सविता गिरी यांनी आभार मानले.यावेळी प्रा. राहुल इंगळे, प्रा. बी आर गोडसे, प्रा. एस एस अग्रवाल, प्रा. बाबासाहेब साबळे, प्रा. डॉ सविता केंजळे, प्रा. कल्याणी हिंगमिरे,प्रा. आर एन घार्गे,प्रा. एम सी गाडे, अधीक्षक आर जी गोडसे उपस्थित होते.