भिगवण : पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ विद्यालयात नागपंचमीचा सण सोमवारी (ता.२१) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
विद्यालयाच्या शिक्षिका प्रतिभा कांबळे यांनी श्रावण महिन्यातील हिंदु संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या नागपंचमी सणाचे महत्त्व व पावित्र्य विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी शाळेतील मुलींनी झिम्मा फुगडी, घोडा चुईफुई, पिंगा काठवटकाना नृत्यखेळ करीत फेर धरला.
दरम्यान, विद्यालयातील शिक्षिका उज्ज्वला वाघमारे, शुभांगी कोळी, सुदर्शना पवार, आरती वागजकर, कीर्ती गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी विद्यार्थीनी व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.