विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख मागण्या –
१) २०२०-२१, २१-२२, २२-२३ स्वाधार योजनेचा संपूर्ण थकीत लाभ पुणे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात त्वरित वितरित करावा.
२) वेळोवेळी पाठपुरावा करूनही ऑनलाइन न झालेली स्वाधार योजना, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ऑनलाईन करण्यात यावी.
३) पुणे जिल्ह्यातील चौकशी/अर्ज निकाली काढण्यासाठी कायमस्वरूपी प्रशिक्षित अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी.
४) शासन निर्णयात स्पष्टता नसलेल्या नियम-अटी विद्यार्थ्यांवर लादून व खर्चिक कागदपत्रांची अवाजवी मागणी वेळीच थांबवली जावी.
५) समाज कल्याण विभागा अंतर्गत विविध शासकीय योजनांचे माहितीचे फलक मागील दोन वर्षांपासून वेळोवेळी पाठपुरावा करूनही
पुणे जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयांमध्ये दर्शनी भागात लावण्यात आले नाहीत ते त्वरित लावण्यात यावेत.
६) समान संधी केंद्रांची कार्यक्षमता सर्व कॉलेज मध्ये वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.
७) रखडलेली २०२१ -२२ MahaDBT पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना त्वरित वितरित करावी.
अर्ज विनंत्या निवेदने देऊन सुद्धा मागण्याची पूर्तता न झाल्याने परिणामी शैक्षणिक वर्षे संपून सुद्धा विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित राहून 11 एप्रिल, 11 मे, 12 डिसेंबर, आणि आता ०३ एप्रिल असे चार चार बेमुदत धरणे आंदोलन करावी लागत आहे,
विद्यार्थी म्हणतात…..
“२०२०-२१, २१-२२, २२-२३ एकूण तीन वर्षापासून मला स्वाधार योजनेचा कुठलाही लाभ मिळाला नाहीये.
– सुबोध देशमाने (अर्जदार विद्यार्थी)
“२०२०-२१, २१-२२, २२-२३ एकूण तीन वर्षापासून मला स्वाधार योजनेचा कुठलाही लाभ मिळाला नाहीये, चौकशी साठी खूप लांबून चकरा माराव्या लागतात, स्वाधार योजना ऑनलाईन झाली पाहिजे.
– साधना ठोके (अर्जदार विद्यार्थी)
“मी २२-२३ यावर्षी स्वाधार योजनेला अर्ज केला आहे, परंतु स्वाधारला फंड नाहींये अस जिल्हा कार्यालयाकडून सांगण्यात येतय, मला आईवडील नाहीयेत, मला जर ज्या त्या वेळी स्वाधार ची रक्कम मिळाली नाही तर मी शिक्षण कस घेऊ? “
– गायत्री गवई (अर्जदार विद्यार्थी)
मागील १ एप्रिल २०२२ पहिल्या आंदोलनापासून आज पर्यंत स्वाधार योजना ऑनलाईन होण्यासाहित शासन निर्णयातील बदला संदर्भात अनेक मागण्या मुख्यमंत्री साहेब, समाज कल्याण विभाग सचिव साहेब, आयुक्त साहेब, जिल्हा सहाय्यक आयुक्त या सर्वां मार्फत फक्त आश्वासनांशिवाय काही निष्पन्न होत नाहीये.
– राजरत्न बलखंडे (समन्वयक, स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती)
पुणे जिल्हा स्वाधार योजना कार्यालयात 5 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज बाबत कार्यवाई करण्यासाठी कायमस्वरूपी कुणी प्रशिक्षित कर्मचारी नाहीये, एक कर्मचारी हजारो विद्यार्थ्याचे अर्ज निकाली कधी निकाली काढणार मोठा प्रश्न मागील 1 वर्षांपासून निर्माण झाला आहे.
– सुमित थोरात (समन्वयक, स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती)