उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन येथील पद्मश्री माणिभाई देसाई महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार बुधवारी (ता. १९) स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत आयोजित प्लास्टिक कचरा संकलन दिन साजरा करण्यात आला. तसेच प्लास्टिक महासंकलन अभियान राबविण्यात आले.
स्वच्छ भारत अभियान संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगत बी ए यांनी मार्गदर्शनातून व उप प्राचार्य डॉ. अविनाश बोरकर यांनी प्लास्टिक कचरा संकलन दिनानिमित्त प्लास्टिक कचऱ्याचे पर्यावरणावर व जैवविविधतेवर होणारे अनिष्ट परिणाम सांगितले. या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. रविंद्र मुंढे यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त भारत बनविण्या संदर्भात मार्गदर्शन केले. या नंतर राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांच्या मदतीने प्रत्यक्ष अभियानाला सुरुवात करण्यात आली.
या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. प्रा. डॉ. शेख कमरून्नीसा यांनी या अभियानाचे आयोजन केले या अभियानासाठी प्रा. डॉ. अमोल बोत्रे, प्राध्यापक विजय कानकाटे, ज्ञानेश्वर पिंजारी, नंदिनी सोनवणे, अनुप्रिता भोर, शुभांगी रानवडे, करण जैन, अंजली शिंदे, वैशाली चौधरी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने हे अभियान उत्साहात साजरा करण्यात आले. या अभियानात शिक्षकेतर कर्मचारी यांचे ही विशेष सहकार्य लाभले.