युनूस तांबोळी
शिरूर : सुनंदा भोगावडे यांची शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याधाम प्रशालेच्या इतिहासात प्रथम महिला मुख्याध्यापिका पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील श्री मंगलमूर्ती विद्याधाम येथे गेले 29 वर्ष कार्यरत असणाऱ्या विज्ञान विषयाच्या अध्यापिका सुनंदा भोगावडे यांची शिरुर शिक्षण प्रसारक मंडळातील विद्याधाम प्रशाला या शाळेतून 1945 या स्थापनेच्या नंतर प्रथमच महिला मुख्याध्यापिका म्हणून वाडेगव्हाण येथे निवड झाली. त्याबद्दल रांजणगाव गणपती येथील शासनमान्य कै. रामभाऊ गोपाळा फंड स्मृती वाचनालय, श्री मंगलमुर्ती विद्याधाम प्रशाला, श्री महागणपती देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत रांजणगाव गणपती, श्री महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल व इतर सामाजिक संस्था या सर्व संस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनिलजी बोरा (अध्यक्ष शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ) नंदकुमार निकम (सचिव शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ) व ह.भ.प.तुकाराम फंड सर अध्यक्षस्थानी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून भोगावडे मॅडमच्या कामाबद्दल विशेष कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी आवर्जून उपस्थित स्वातीताई पाचुंदकर (जि.प.सदस्य), विक्रम पाचुंदकर (पं.स.सदस्य), बापुसाहेब शिंदे (अध्यक्ष युवा सेना पुणे जिल्हा), डॉ.विकास शेळके (संस्थापक महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल),प्रा.माणिक खेडकर, महेश फंड (चेअरमन वि.वि.का.स.सो.),संपतशेठ खेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात युनुस तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या गीत मंचाने स्वागत गीत गायनाने केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राचार्य गोळे सर,प्रा. गणपत बत्ते, प्रा.निलेश काळे, प्रा.घावटे सर, उद्योजक नेताजी फंड, सतीश क्षीरसागर, नामदेव पाचुंदकर, प्रवीण पाचुंदकर, घोडके मॅडम, बोबडे मॅडम आणि अनेक आजी माजी विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नारायणी फंड, कविताताई खेडकर, प्रा.नारायण पाचुंदकर सर, मुख्याध्यापक वेताळ सर, पर्यवेक्षक पाचकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी फंड व संजया नितनवरे आणि तर आभार ग्रंथालय संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष विवेकानंद फंड यांनी केले.