विशाल कदम
लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता पाचवीतील प्रथम नितीन भट या विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून शिष्यवृत्ती मिळवली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांची जुलै २०२२ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेस रेनबो इंटरनॅशनल स्कूल, लोणी काळभोर येथील ८ विद्यार्थी बसले होते.
यामध्ये इयत्ता ५ वी तील प्रथम नितीन भट या विद्यार्थ्याने उत्तमरित्या यश संपादन करून शिष्यवृत्ती मिळवली आहे.
दरम्यान, शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना प्रशांत लाव्हरे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्याचे व मार्गदर्शकांचे शाळेचे अध्यक्ष नितीन काळभोर, प्राचार्या मीनल बंडगर यांनी कौतुक केले.