सुरेश घाडगे
परंडा : सिरसाव (ता. परंडा) ग्रामपंचायतीच्या कामकाजाची पाहणी ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता.३०) केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी कृषी – शेती विषयक माहिती अभ्यास दौरा केला व वन विभागालाही भेट दिली.
संस्थेच्या सचिव तथा जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्षा आशा गोरख मोरजकर यांनी आपल्या मनोगतातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास दौरे आयोजित करणे ही काळाची गरज आहे. असे मत व्यक्त करून आभार मानले.
दरम्यान, दौरा यशस्वी करण्यासाठी आश्वीनी जोगी, शबाना सय्यद, रेखा पाडुळे, राहुल खरसडे, निता जाधव, शाहीन हान्नुरे, ज्योती हजारे, भाग्यश्री कदम, गुलेरीम चौधरी, प्रमोद जाधव यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच कुमार वायकुळे, ग्रा.सदस्य मुकुंद चोबे , रामेश्वर चोबे, वनमाला चोबे , कल्पना काटकर , मंगेश जाधव, सुहास खराटे, बालाजी पाटील, पांडुरंग पाटील, नामदेव गुरव, सामाजिक वनीकरणचे शेवाळे, औसरे, सय्यद, रोडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.