लहू चव्हाण
पाचगणी : लहान वयात जड दप्तरे वाहून नेणाऱ्या विद्यार्थ्यांना नंतर पाठीचे, मणक्याचे आजार जडतात हे वैद्यकीय अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे पा
ठीवरील दप्तराचे ओझे कमी केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत मिळाली पाहिजे. आणि ते शैक्षणिक नवनिर्मितीच्या निमित्ताने महत्त्वाचे पाऊल आहे. असे प्रतिपादन आंब्रळच्या सरपंच माधुरी आंब्राळे यांनी केले.
आंब्रळ (ता.महाबळेश्वर) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब व आंब्रळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शैक्षणिक टॅबचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलतानासरपंच माधुरी आंब्राळे यांनी वरील प्रतिपादन केले आहे. यावेळी पाचगणी रोटरीचे अध्यक्ष भुषण बोधे, सचिन स्वप्निल परदेशी, भिलार केंद्र प्रमुख दिपक चिकने आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, जयवंत भिलारे म्हणाले, डिजीटल तंत्रज्ञान ब्रह्मास्त्र सारखे आहे. याचा योग्य वापर केला तर येणारी भावी पिढी कडून देशाच्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान राहील. असे भिलारे यांनी सांगितले आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण आंब्राळे, प्रोजेक्ट प्रमुख जयवंत भिलारे, ग्रामसेविका सपना जाधव, उपसरपंच उमेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य विकास जंगम, माधुरी जंगम, भानुदास बिरामणे,सारीका आंब्राळे, संतोष आंब्राळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता मोरे यांनी केले तर आभार मोहिनी माने यांनी मानले.