लोणी काळभोर, (पुणे) : फोर्ज एक्सेलरेटर कोईम्बतूर, तामिळनाडू आणि सेंच्युरियन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (CUTM), भुवनेश्वर येथील नोडल सेंटरवर आयोजित स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022 या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी दोन श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले. दोन्ही संघाला प्रत्येकी १ लाख रुपयाचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या बायोइंजिनियरिंग अभ्यासक्रमाला शिकत असलेला विद्यार्थी सिरी संपगावकर यांनी विजेत्या संघाचे नेतृत्व केले. यात संघात अंशुमी पाटील, आर्या पदुरे, सब्यसाची बॅनर्जी, समृद्धी वालस्कर, शर्वरी देशमुख यांचा समावेश होता. या संघानी १ लाख रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले.
‘अॅक्ट्युएटर या संघाने ईएमजी सेन्सिंग यंत्रणेच्या मदतीने पेन्युमॅटीक प्रणालीद्वारे नियंत्रित गुडघा अॅक्ट्युएटर प्रणालीवर काम केले. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या प्रकल्पावर चर्चा करण्याची टीमला संधी मिळाली.
याशिवाय, सदाफ शेख यांच्या नेतृत्वाखालील ‘अल-एफए’ ही दुसरी संघाने सेंच्युरियन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (CUTM), भुवनेश्वर येथे 1 लाख रुपयांचे पहिले पारितोषिक जिंकले. या संघात सर्वेश जाधव, सुमेध येवले, प्राजक्ता धारवाड, अथर्व टिके आणि किरण मराठे यांचा समावेश होता. या संघाने रेडी टू युज फर्स्ट-एड किट वर त्यांचे नावीन्य दाखवले. संरक्षण कर्मचाऱ्यांना या कीटचा उपयोग होऊ शकतो.
शिक्षण मंत्रालय आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) द्वारे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकाथॉन मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून एकूण सात संघ नामांकित करण्यात आले होते. दरम्यान, कोईम्बतूर आणि भुवनेश्वर येथील वेगवेगळ्या नोडल केंद्रांवर आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन संघाने पुरस्कार मिळवले.
एमआयटी स्कुल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स आणि रिसर्चच्या प्रिन्सिपल डॉ रेणू व्यास, यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अतुलनीय कामगिरीसाठी सर्व प्राध्यापकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कुल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स आणि रिसर्चचे संचालक प्रा. विनायक घैसास, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि रिसर्च आणि डेव्हल्पमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. मोहित दुबे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन करत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.