हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील ६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (N.M.M.S) दोघांनी यश मिळविले असल्याची माहिती प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
पियुष सतीश सोनवणे, गायत्री सोमनाथ जगताप, प्राची विकास शिंदे, तनिष्का दत्तात्रय खेडेकर, उम्मेरूमान आरिफ शेख, स्मृती समीर पवार अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (N.M.M.S) पियुष सोनवणे व अभिषेक महिपाल अशी त्या दोघांची नावे आहेत.
३१ जुलै २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत ६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. या विद्यार्थ्यांना शेखर शिंदे, वैशाली ढोबळे, शीतल वाळके, रुपाली खानदेशे, ज्योत्सना काळे, सविता कडलग यांनी तर (N.M.M.S) परीक्षेसाठी अश्विनी पवार, लाजवंती दौंडकर, वृषाली पाटील, तानाजी मेंढे यांचे मार्गदर्शन लाभले.
दम्यान, विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत भोसले, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी सर्व विश्वस्त, खजिनदार राजाराम कांचन, उपप्राचार्य कोकाटे सर, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.