अजित जगताप
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षिका हेमलता शंकर झेंडे यांना भारतीय महिला मंच व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे झालेल्या पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार संजय आवटे, सुप्रसिद्ध कवयित्री दिशा पिंकी शेख, सुप्रसिद्ध कवी व लेखक डॉ. सतीशकुमार पाटील, धम्म अभ्यासक विजया कांबळे, ॲड. मंचकराव डोणे, डॉ. नंदकुमार गोंधळी, ॲड. करुणा विमल या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हेमलता झेंडे यांनी सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरसाळे, शिरसवडी, अंबवडे, उंबर्डे, निमसोड तसेच बोबाळे या ठिकाणी ज्ञान दानाचे कार्य करीत आहेत. शिक्षणापासून वंचित असलेल्या फासेपारधी समाजातील मुलांना शाळेत प्रवेश देऊन त्यांच्या मध्ये परिवर्तन घडवून आणले आहे.
सामाजिक बांधिलकी स्वीकारुन त्यांनी करोना काळात समाज प्रबोधन केले. वाड्यावस्तीत जाऊन गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना व अभ्यासवर्ग चालविले. गरिबांना अर्थ सहाय्य करून त्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न केले. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यामुळे तसेच पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते,रणजितसिंह देशमुख, शहाजीराजे गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे, गट विकास अधिकारी उदयसिंह साळुंखे मान्यवरांनी अभिनंदन केले.