SSC Result Declared : पुणे : दहावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाच्या वर्षी निकाल ९३.८३ लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे. (Class 10 result declared by Maharashtra Board, total 93.83 percent students passed; Konkan division wins while Nagpur division has the lowest result..)
१५ लाख २९हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९८.११टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (SSC Result Declared ) तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे. गुणपत्रिका १४ जून रोजी दुपारी ३ वाजता शाळेत मिळणार आहेत.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,३९७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,३१२ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७,६८८ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण (SSC Result Declared ) उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.४९ आहे. इ.१० वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावीच्या मार्च – एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत. (SSC Result Declared )
कुठे पाहाल निकाल?
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.