उरुळी कांचन, (पुणे) : येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व इंग्रजी माध्यम शाळा तसेच महादेवराव कांचन कनिष्ठ महाविद्यालय व फार्मिसिटीकल महाविद्यालय यांच्या संयुक्तपणे आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शैक्षणिक संकुलात उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
अजिंक्य फाऊंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, विद्यालयीन, इंग्रजी माध्यम शाळातसेच महादेवराव कांचन कनिष्ठ महाविद्यालय, फार्मिसिटीकल महाविद्यालय यांच्या शैक्षणिक वर्षे २०२२ ते २३ वर्षांतील स्नेहवर्ध क्रिडा स्पर्धा व स्नेहसंमेलन शैक्षणिक संकुलात २३ ते २५ जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विश्वास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक उमेश शहा व ‘रांका’ ज्वेलर्स उद्योग समूहाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, संस्थेचे सचिव व क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, संचालिका अस्मिता बहिरट, संचालिका ऋतुजा कांचन, प्रतिभा कांचन, कार्यकारी संचालक अप्पासाहेब जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, स्नेहवर्ध क्रिडा स्पर्धेत खो-खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, थाळी फेक, गोळा फेक, उंच उडी, धावणे स्पर्धा अशा क्रिडा प्रकारांचा सामावेश करण्यात आला होता. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल, प्रशक्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. तर वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात राष्ट्रभिक्तीपर गीते, प्रबोधात्मक गिते, सांस्कृतिक गिते अशांवर विद्यार्थ्यांनी रचनात्मक नृत्य साकारीत उपस्थितांची मने जिंकली.