Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणीत स्काऊट -गाईड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शिबिरात सुमारे ७७० विद्यार्थी सहभागी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 February 2023, 16:00

लहू चव्हाण

पाचगणी : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात स्काऊट-गाईड जीवनशैली अंगीकारून आपला विकास साधला पाहिजे असे आवाहन महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांनी केले.

जिल्हा परिषद सातारा, भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने तळदेव येथील इलाबेन महेता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तालुकास्तरीय कब बुलबुल आणि स्काऊट गाईड एक दिवसीय शिबीर प्रसंगी मरभळ बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, केंद्रप्रमुख प्रकाश भिलारे, दिपक चिकणे, दिलीप जाधव, केंद्रसंचालक संजय संकपाळ तसेच मार्गदर्शक भालचंद्र सोनावणे, संघटक कविता चौगुले, सुरेश चव्हाण, उमेश मिसाळ आणि मुख्याध्यापक एस. आर. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मंगळवारी (दि.३१) आयोजित केलेल्या शिबिरात ७७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळच्या सत्रात सर्व शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर स्काऊटच्या परंपरेनुसार ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर प्रार्थना, ध्वजगीत गायनाने शिबीरास सुरूवात झाली.

कब आणि बुलबूल युनिट श्री तळेश्वर मंदिराच्या प्रांगणात क्रमबद्ध ६ -६ जणांच्या रांगेत उभे राहून टाळ्यांच्या विविध प्रकारांचा सराव घेण्यात आला. यानंतर कब बुलबूलचे नियम, वचन, वंदन, हस्तांदोलन, कबचे गीत, प्रार्थना, गोलातील मनोरंजक खेळ, तारा व मोगलीची गोष्ट, बडी सलामी व जंग की आरोळीचा सराव घेण्यात आला.

स्काऊट आणि गाईड युनिटला विद्यालयाच्या प्रांगणात स्काऊट व गाईडचे वचन, ध्येय, नियम, हस्तांदोलन, अभ्यासक्रम उजळणी, प्रार्थना, ध्वजगीत, विविध खेळ, गाणी, प्रथमोपचार, गाठीचे प्रकार आणि टाळ्यांचे प्रकार तसेच मागाच्या खुणा, जंगलभ्रमंती व त्यामधील आठवणी, बेडन पॉवेल यांचे जीवनचरित्रातील प्रसंग, बलोपासना, संदेशन पद्धती इ.बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

समारोप सत्रात सर्व सहभागी शाळांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सरतेशेवटी शिबीराचा समारोप ध्वजावतरण व राष्ट्रगीत गायनाने करण्यात आला.

सदर शिबीराच्या यशस्वितेसाठी कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेवच्या सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील सर्व केंद्रांचे क्रीडा समन्वयकांच्या समवेत श्रीनिवास ढाणे, चंद्रकांत जंगम, पांडुरंग संकपाळ व सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक यांच्या सहकार्याने शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा समन्वयक गणेश शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी निकम यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

सायबर सेलचे नितीन शिंदे यांचे अपघाती निधन : खेळाडू, उत्कृष्ट रनर अन् आरोपींचा कर्दनकाळ अशी ओळख ; पोलीस दलात हळहळ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.