पुणे : बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता ही मागणी मान्य करण्यात आली आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे. या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत.
दरम्यान, याआधी दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत होती. या मागणीला यश आले आहे.
परीक्षेची सुधारित वेळ
सकाळी ११ ते दुपारी २ :१० वाजेपर्यंत
सकाळी ११ ते दुपारी १ :१० वाजेपर्यंत
सुधारित वेळ सकाळी ११ ते दुपारी १ :४० वाजेपर्यंत
दुपारच्या सत्रातील सुधारित वेळापत्रक
दुपारी ३ ते सायंकाळी ६ :१० वाजेपर्यंत
दुपारी ३ ते सायंकाळी ५ :१० वाजेपर्यंत
दुपारी ३ ते सायंकाळी ५ :४ वाजेपर्यंत