सुरेश घाडगे
परंडा : येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयाची विध्यार्थीनी स्नेहल सुधाकर कोकाटे हिने वनस्पतीशास्त्र या विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सर्वांत जास्त गुण मिळवून सुवर्णपदक मिळवले आहे. तर शामराव त्रिंबकराव टिळक पुरस्कार व स्व. यमुनाबाई बळवंतराव देशपांडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या २०२१ च्या पदव्युत्तर परीक्षेमध्ये कोकाटे हिने हे यश संपादन केले आहे. स्नेहल कोकाटे हिने पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच हाड जोडीवर राष्ट्रीय स्तरावर वेब ऑफ सायन्स आणि यूजीसी लिस्टमध्ये संशोधन पेपर ही प्रकाशित केला होता.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते तीचा व पालक यांचा परंडा पंचायत समितीचे माजी उपसभापती सुधाकर कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. प्रकाश सरवदे, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. महेशकुमार माने, डॉ. शहाजी चंदनशिवे, डॉ. राहुल देशमुख, परंडा परंडा पंचायत समितीचे माजी उपसभापती सुधाकर कोकाटे आदी उपस्थित होते.