मोहाली : चंदीगड विद्यापीठात तब्बल ६० विद्यार्थिनींचा आंघोळ करताना व्हिडिओ एका विद्यार्थिनीने रेकॉर्ड करून व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती काल शनिवारी (ता.१७) रात्री समोर आली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसतिगृहातील ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे.
#chandigarhuniversity में छात्रा ने बनाई 60 स्टूडेंटस की नहाते वक्त वीडियो, आठ ने किया आत्महत्या प्रयास, #चंडीगढ़ यूनिवर्सिटी में हंगामा #Chandigarh #ViralVideo pic.twitter.com/53Ip3gKjkf
— KAMLESH BHATT कमलेश भट्ट (@kamleshcbhatt) September 18, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आंघोळ करताना ६० विद्यार्थिनींचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आणि तिने हे व्हिडिओ एका शिमला येथील एका मुलाला पाठवत होती. आणि तो मुलगा ते व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करायचा.असे अत्यंत गंभीर आरोप विद्यार्थिनींनी केले आहेत. तर या घटनेमुळे वसतिगृहात राहणाऱ्या ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. तर एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
Protest breaks out in #Chandigarh University, MMS of various girls living in Hostel of Chandigarh University got viral.
Apparently, Videos were recorded by a #Girl from the same hostel & were forwarded to her Boyfriend.
4 Girls have committed Suicide???? pic.twitter.com/eAkHwNVZMm
— The Analyzer (@Indian_Analyzer) September 18, 2022
त्यानंतर विद्यार्थिनींनी शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास विद्यापीठाच्या गेट क्रमांक २ वर गोंधळ घातला. आणि जोरदार निदर्शने केली. या घटनेची माहितीची मिळताच, पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थिनी शांत झाल्या. तर पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, सध्या आरोपी विद्यार्थिनीची ओळख पटली असून वसतिगृहात विद्यापीठ प्रशासनाने तिची चौकशी केली आहे. चौकशीत विद्यार्थिनीने सांगितले की, ती बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती. आणि हे व्हिडिओ शिमला येथील मित्राला पाठवीत होती. अशी माहिती समोर आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल किंवा अटक करण्यात आली नाही.