अक्षय भोरडे
Shirur News : तळेगाव ढमढेरे, (पुणे) : पाबळ (ता. शिरुर) येथील विज्ञान आश्रमात जागतिक कीर्तीचे विज्ञान आश्रमाचे संस्थापक डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित विज्ञान प्रदर्शनास विठ्ठलवाडीतील श्री.पांडूरंग विद्यामंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देत विज्ञानासह विविध प्रकल्पांची माहिती घेतली.
विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले…
पाबळ ता. शिरुर येथील विज्ञान आश्रमात जागतिक कीर्तीचे विज्ञान आश्रमाचे संस्थापक डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनास महाराष्ट्रातील हजारो युवक – युवती व शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेत आहेत. (Shirur News)
विठ्ठलवाडी येथील श्री. पांडूरंग विद्यामंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ व वर्गशिक्षक प्रवीणकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील वैष्णवी गवारे, कृष्णली गवारे, दिव्या गवारे, संध्या झिने, अन्वी गवारे, आर्या भुजबळ, आर्या ढमढेरे, आर्या गायकवाड, श्रेया ढमढेरे या विद्यार्थीनींनी विज्ञान आश्रमातील प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनात मांडलेले विविध प्रयोग समजावून घेऊन सर्व प्रयोग उत्सुकतेने पाहिले. (Shirur News)
मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ म्हणाले, “पाबळच्या विज्ञान आश्रमाला आमच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन नाविण्यपूर्ण प्रयोग पाहिले असून पर्यावरण, कृषी, उद्योग, डिजिटल टेक्नॉलॉजीचे अद्ययावत प्रयोग पाहायला मिळाले. ते सर्व तंत्रज्ञान शहरी भागातून ग्रामीण भागासाठी महत्वाचे असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हि पर्वणी आहे.” (Shirur News)
फोटो ओळ : पाबळ (ता. शिरुर) येथील विज्ञान आश्रमास भेट देताना श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयाचे विद्यार्थी.