युनूस तांबोळी
Shirur news : शिरूर : शिरूर तालुक्यातील बेट भागातील शाळांमधून बारावी परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा यश मिळण्यासाठी प्रयत्न करताना प्रोत्साहन मिळू लागले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निकालाची घसरण झाल्याची कबूली शाळांच्या प्रमुखांकडून येऊ लागली आहे. (12th pass percentage from schools in island region has dropped)
शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यावर भर
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स फेब्रु/मार्च एच एस सी 2023 परीक्षेचा विद्यालयाचा शेकडा निकाल 86.20 लागला असल्याची माहिती प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ यांनी दिली. या विद्यालयात प्रतीक्षा खंडू किठे 69.67 टक्के, दीप्ती मारुती गाडेबैल 69.50 टक्के, मयुरी परशुराम पोळ 67.17 टक्के मिळाले आहे. (Shirur news ) या विद्यालयातून २९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. ३ परीक्षेसाठी गैरहजर तर २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
कान्हूर मेसाई ( ता. शिरूर येथील विद्याविकास मंडळाचे विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल..९७ टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्य अनिल शिंदे यांनी दिली. परीक्षेसाठी ८३ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरले होते. परीक्षेला गैरहजर (आजारी असल्याने) ०१ होता. एकूण प्रविष्ट..८२ उत्तीर्ण..७९…अनुत्तीर्ण..०३ असा विद्यालयाचा शेकडा निकाल..९७ टक्के लागला आहे. (Shirur news )
यामध्ये शास्त्र शाखा..२८..सर्व उत्तीर्ण…१००टक्के, वाणिज्य शाखा २२. सर्व उत्तीर्ण..१००टक्के, कला शाखा.. ११ उत्तीर्ण..०९/ अनुत्तीर्ण ०२, तर व्यवसाय अभ्यासक्रम..२१..उत्तीर्ण २० /अनुत्तीर्ण ०१ असा निकालाचा गोषवारा असल्याचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले. (Shirur news )
ग्रामीण भागात शास्त्र,वाणिज्य,कला व व्यवसाय अभ्यासक्रम ह्या चारही शाखा असणारे एकमेव विद्यालय असून शिक्षक सेवानिवृत्त होऊनही त्यांच्या जागी शिक्षक भरती न झाल्याने ४ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. (Shirur news ) इतर शिक्षकांवर त्यामुळे कामाचा अतिरिक्त भार..तरीही कोणतीही तक्रार न करता जबाबदारी स्वीकारून शिक्षकांकडून कौतुकास्पद कामगिरी करत आहेत.
विनाअनुदानित तुकड्यांना शिकविणाऱ्या प्राध्यापकांना तुटपुंजे वेतन… तरीही त्यांची विनातक्रार काम करण्याची क्षमता आहे. कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदा ही परीक्षा पाबळ केंद्रावर पार पडली.(Shirur news ) इंग्रजी विषयाला शिक्षक मिळविताना मंडळ व शाळा प्रशासन यांची तारेवरची कसरत..
दोन शिक्षक बदलले.. शासनाकडून शिक्षक उपलब्ध नाही,म्हणून मानधन तत्वावर इतरांकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. (Shirur news ) काही पालकांची त्यांच्या मुलांबाबत उदासीनता, अनेकदा संपर्क करूनही पाल्यांच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद नसल्याने काही अंशी (२/३ %) निकालावर परिणाम झाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील मा बापूसाहेब गावडे उच्च माध्यमिक विद्यालय बारावीचा निकाल विज्ञान-100टक्के, कला -85.36 टक्के, तांत्रिक-80 टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य आर. बी. गावडे यांनी दिली. (Shirur news )
विज्ञान
१- भोंग त्रषीकेश लक्ष्मण-६८.६७
२- टिळेकर वैष्णवी रविंद्र-६६.००
३- पाराठे साक्षी संतोष-६४.५०
कला-
१- थोरात गौरी दादाभाऊ-६६.००
२- बाराहते पुजा संतोष-६५.८३
३- गायकवाड साक्षी रविंद्र-६५.३३
टेक्निकल-
१- भुते विनायक भाऊसाहेब-६५.५०
२- इचके गणेश संतोष-६२.६७
३- पऱ्हाड रोहन पोपट-६२.३३
दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे,सचिव राजेंद्र गावडे,सहसचिव सुनिता गावडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभीनंदन केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या विज्ञान, कला, वाणिज्य इयत्ता १२ वी शाखांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन. विद्यार्थ्यांनी करीयर करण्यासाठी योग्य क्षेत्राची निवड करावी. वेगवेगळ्या संधी प्राप्त करून फक्त नोकरी मिळावी हे ध्येय ठेवू नका. यातून यशस्वी उद्योजक तयार होण्यासाठी या काळातच योग्य पर्याय निवडला पाहिजे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा जोमाने अभ्यास करून यश गाठावे. स्पर्थात्मक युगात अनेक पर्यायांचा वापर करून पुन्हा यशस्वी होण्याचा प्रयत्न करा.
-दिलिप वळसे पाटील, माजी गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य
बारावी ची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते. यानंतर योग्य क्षेत्र निवडताना योग्य सल्ला घेऊन विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाचा पर्याय निवडावा. त्यातून जीवनात वेगळे काही करून दाखविण्याची संधी प्राप्त करावी. यामुळे समाज, आर्,वडील, शिक्षक व देशालाही अभिमान निर्माण होण्याचे कार्य आपल्या हातून होणार आहे.
-पोपटराव गावडे, माजी आमदार, शिरूर
बारावी नंतर अनेक वेगवेगळ्या संध्या मिळवून विद्यार्थी पुढील शिक्षण घेत असतात. पण कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कोर्स करावेत.त्यातून वेगवेगळ्हया व कंपनी मधून नोकरीची संधी मिळवता येईल. अशा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्ष नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम करते.
मानसिंग पाचुंदकर
(अध्यक्ष-आंबेगाव शिरूर विधानसभा राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्ष)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :