प्रिया बंडगर
लोणी काळभोर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धेत लोणी काळभोर (ता.हवेली) येथील इंग्लिश मिडीयम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने चमकले आहेत.
सालाबादप्रमाणे यावर्षीही शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय २०२२-२३ स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर येथील न्यू मॉडेल स्कूल येथे शुक्रवारी (ता.१७) करण्यात आले होते.
या स्पर्धेत लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निबंध लेखन, वकृत्व, चित्रकला चमकदार कामगिरी केली आहे. तसेच सुगम संगीत स्पर्ध्येमध्येही लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या स्पर्धा संस्थेच्या सचीवा शुभांगी गावडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यावेळी वाशी येथील न्यू मॉडेल स्कूलचे प्राचार्य मनोज गुरव , लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शाहीन शेख, कोतवाल सर, वहिदा शाहेदिवन व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, लोणी काळभोर परिसरातील नागरिकांकडून विजेत्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक होत असून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच विजेत्या स्पर्धकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या वतीने इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका पोर्णिमा शेवाळे यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
विजेत्या स्पर्धकांची नावे
निबंध लेखन (लहान गट)
शिवतेज मलंगे (द्वितीय क्रमांक)
निबंध लेखन (मोठा गट)
प्रिया सातपुते (तृतीय क्रमांक)
वकृत्व स्पर्धा (मोठा गट)
१)कन्हेरे ओम (प्रथम क्रमांक)
२)प्रिया सातपुते (द्वितीय क्रमांक)
वकृत्व स्पर्धा (लहान गट)
आर्या मिसाळ (प्रथम क्रमांक)
चित्रकला स्पर्धा – (मोठ्या गट)
पृथ्वीराज राजेंद्र काळभोर (प्रथम क्रमांक)