उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन व लोणी काळभोर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टरच्या २२ विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या ‘अबॅकस’ स्पर्धेत बाजी मारली असून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर’ संस्थेचे अध्यक्ष नवनाथ हंबीर यांनी दिली.
पुणे येथील वर्धमान हॉल बिबवेवाडी या परीक्षा केंद्रावर नुकतीच हि स्पर्धा पार पडली होती. या परीक्षेसाठी राज्यातून २ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. या परीक्षेत उरुळी कांचन येथील विद्यार्थ्यानी ६ मिनिटांच्या वेळेत १०० गणिते सोडवली. यामध्ये संस्थेच्या २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थीना संस्थेचे संस्थापक नवनाथ हंबीर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. तसेच प्रशिक्षका किरण शेळके, वैष्णवी शिंदे, सृष्टी झाडे, ऋतिका कोऱ्हाळे, हेमा चाबुकस्वार, क्षितिजा ठाकूर यांनी विशेष तयारी करून घेतली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
( उरुळी कांचन विजेते )
श्लोक अमित शिंदे, दर्शन प्रशांत शितोळे, करण गणेश चौधरी, तेजस नानासाहेब चौधरी, ज्ञानदा प्रवीण चौधरी, आर्या रवींद्र शेळके, तनिष्का संदीप जाधव, स्वराज पोपट चौधरी, अंश राहुल कांचन, ओवी राहुल कांचन, वेदिका महेश फोंडे, विराज महेश फोंडे, विराज पोपट चौधरी, साई नानासाहेब चौधरी, वैभव प्रदीप नायर, ईश्वरी भूषण शिंदे, शुभम कचरू सानप,
( लोणी काळभोर विजेते )
श्रेयश किशन काळे, रुद्र अनिल जाधव, पूर्वी राहुल नलवडे.