नवी दिल्ली : राष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून नीट-पीजी २०२४ परीक्षेच्या प्रारूपातील अंतिमसमयी करण्यात आलेल्या बदलावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. ही फारच असामान्य स्थिती असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊ शकते, असे न्यायालय म्हणाले. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी राष्ट्रीय शिक्षण मंडळ आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवून एका आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे.
या प्रकरणी पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट-पीजी प्रवेश परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचे स्वरूप, प्रश्न, गुणांचे सामान्यीकरण यांमध्ये अंतिम समयी बदल करण्याशी संबंधित याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करत आहे.