पुणे : राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२४ साठी अर्ज करण्याची संधी आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाबरोबरच संशोधनासाठीची पात्रता परीक्षा म्हणून ‘सेट’कडे पाहिले जाते. आपल्या भविष्यातील करिअर संधींसाठी सेट मूल्यवृद्धीचे काम करू शकते. मात्र, त्यासाठी तुम्हाला पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल किंवा उत्तीर्ण व्हायला हवं.
आज शुक्रवारपासून (ता. १२) ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे ही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३९व्या महाराष्ट्र सेट परीक्षेची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ७ एप्रिल २०२४ ला महाराष्ट्रासह गोव्यातही ही परीक्षा घेतली जाणार आहे.
ऑफलाइन पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
पेन आणि पेपरने होणारी ही शेवटची परीक्षा आहे. म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणारी ही शेवटची परीक्षा असल्याचे सेट विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतरच्या किंवा इथून पुढे सेट परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
‘सेट’बद्दल थोडक्यात
* पात्र विद्यार्थी : पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाचे किंवा उत्तीर्ण झालेले सर्व
* परीक्षेचे स्वरूप : परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न
* पेपर : पेपर क्रमांक एक हा गणित, सामान्यज्ञानासह इतर विषयांवरील प्रश्नांवर आधारित असेल. तर पेपर क्रमांक दोन * विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विशेष विषयाचा असणार आहे.
* शुल्क : परीक्षेच्या नोंदणीसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आठशे रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साडेसहाशे रुपये इतके शुल्क आहे.
* नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत : १२ ते ३१ जानेवारी २०२४
* विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत : १ ते ७ फेब्रुवारी २०२४
* ऑनलाइन अर्ज दुरुस्तीची मुदत : ८ ते १० फेब्रुवारी २०२४
* प्रवेशपत्र उपलब्धतेचा संभाव्य दिनांक : २८ मार्च २०२४
* परीक्षेचे आयोजन : ७ एप्रिल २०२४