पुणे : सरहद प्री-प्रायमरी स्कूल मध्ये आजी आजोबा दिवस मोठ्या थाटामाटात मंगळवारी (ता.२८) साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सिनेअभिनेते संतोष चोरडिया यांनी हजेरी लावली आहे.
सरहद प्री-प्रायमरीतर्फे हा उपक्रम गेली १४ वर्षापासून सातत्याने घेतला जात आहे. यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने आजी-आजोबा सहभाग घेतात. त्याचप्रमाणे यावर्षीही २ वर्षाच्या पँडॅमिक नंतर आजी-आजोबांचा सहभाग व प्रतिसाद उत्तम होता. यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात होते.
आजींनी स्वादिष्ट, रुचकर व पौष्टिक नातवंडांच्या डब्यासाठी लागणाऱ्या अशा छानश्या रेसिपी बनवल्या होत्या. सर्व स्पर्धांमध्ये सर्व आजी-आजोबांनी सक्रिय सहभाग घेतला. डोळ्यांवर बांधून आजींच्या चित्रावर टिकली चिटकवणे व संगीत खुर्ची खेळताना तर आजींनी आपले वय विसरून मनमुराद आनंद घेतला. त्याचप्रमाणे आजोबांसाठी देखील भेटकार्ड बनवण्याची स्पर्धा होती, पायांच्या बोटात गोट्या पकडून एका बास्केटमधून दुसऱ्या बास्केटमध्ये टाकण्याची स्पर्धा होती तर रिंग कोणमध्ये टाकून निशाणा साधण्याच्या स्पर्ध्येचेही आयोजन आजोबांसाठी केले होते.
आंतरराष्टीय कलाकार, सिनेअभिनेता संतोष चोरडिया व त्यांच्या सहकलाकार डॉ. कविता घिया प्रस्तुत जीवनातील सुखद आठवणींना हळुवारपणे उलगडत नेणारा अनोखा टॉक शो विनोद, गाणी आणि किस्से असा रंगारंग कार्यक्रमाचेही आयोजन खास आजी-आजोबांसाठी करण्यात आला होता.
आजी-आजोबांनी या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद देत आपले मनोगत व्यक्त करताना काही आजी-आजोबा भावुक झाले तर काहींनी आज स्वतःसाठी वेळ मिळाल्या बद्दल संस्थेचे व सर्व मान्यवरांचे आभार मानले. त्याचप्रमाणे आजी-आजोबांनी मनसोक्त भजनं, चारोळ्या तर गायल्या त्याच बरोबर गाण्यांच्या ठेक्यावर सुंदर असा नाचही प्रस्तुत केला. या कार्यक्रमाची सुरवात सरहद प्री-प्रायमरी मुख्याध्यापिका पल्लवी पासलकर यांनी केली तर कार्यक्रमाची सांगता पर्यवेक्षिका कविता कसबेकर यांनी सर्वांचे आभार मानून केली.
दरम्यान, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शोभना वाडेकर आई, सरहद संस्थेचे विश्वस्थ शैलेश वाडेकर, सरहद स्कूल सीबीएसईच्या मुख्याध्यापिका कविता वानखेडे, सरहद पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सुजाता गोळे, सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. जाधवर व उपप्राचार्या डॉ. संगीता शिंदे व डॉ. राजेंद्र जगताप या सर्व मानवारांच्या हस्ते विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.