राजेंद्रकुमार शेळके
पुणे – संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिवस आणि विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात सोमवारी (ता. २७) साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव व सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड उपस्थित होते.
यावेळी मुलांनी विविध प्रकारचे २८० प्रकल्पांचे सादरीकरण केले. यात टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवले. पोषण आहार, जलचक्र, सोलर सिस्टिम, मॅग्नेटिक फिल्ड, स्मार्ट सिटी, वाहतुकीची साधने, गणितीय संबोध आणि प्रमेय, हायड्रोलिक लिफ्ट, थर्मल पॉवर, प्लांट, व्हॅक्युम क्लिनर, स्मोक डिटेक्टर, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ग्लोबल वॉर्मिंग, रूम हीटर, विंडमिल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आन्सर डिटेक्टर, थ्रीडी होलोग्रम, थ्रीडी मोबाईल प्रिंटर, फ्लोअर मिल, थ्रीडी मॉडेल ऑफ ॲटम, एलिमेंट्स अँड कंपाउंड, रक्ताभिसरण संस्था, डायव्हर्सिटी, फूड चेन, ड्रिप इरिगेशन, स्वच्छ भारत अभियान, फेजेस ऑफ मून, फोटोसिंथेसिस, भूकंप मापक यंत्र, एक्लिप्स ,फ्लोट हाऊस फोर फ्लड डिटेक्टर, इफेक्ट्स ऑफ जंक फूड, सेफ्टी ऑन रोड, लाइफ सायकल अशा विविध प्रकल्पांचे विद्यार्थ्यांनी आलेले पाहुणे व पालक यांच्यापुढे स्पष्टीकरण केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या व अशाच नवनवीन संकल्पना मुलांनी प्रत्यक्षात उतरवल्या पाहिजेत असे वक्तव्य केले. तसेच गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकल्पांचे कौतुक केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे यांनी मराठी राजभाषा दिवस व विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पुढे बोलताना साठे म्हणाल्या कि, ज्या उद्देशाने आपण या कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. तो उद्देश मुलांनी नक्कीच पूर्ण केला पाहिजे. तुम्ही सर्व विद्यार्थीच उद्याचे लेखक, कवी, वैज्ञानिक होणार आहात. त्यामुळे चांगले शिक्षण घेऊन शिक्षकांनी व आई-वडिलांनी जे संस्कार दिले आहेत. त्या संस्कारांचा नक्कीच अंमल करावा.
दरम्यान, या कार्यक्रमाचे आणखीन एक प्रमुख आकर्षण म्हणजे रोल नंबर नुसार इयत्ता सातवी डिसेंबर, इयत्ता आठवी जानेवारी, व इयत्ता नववी फेब्रुवारी महिन्यातील संशोधक जन्म व मृत्यू नुसार यांची माहिती यांचे बॅजेस बनवण्यात आले. मुलांनी ते आपल्या युनिफॉर्मवर लावले. इयत्ता सातवी, आठवी व नवीच्या विद्यार्थिनींनी विविध विज्ञान विषयक रांगोळ्यांचे सादरीकरण केले.
विज्ञान दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले. सर्व विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांनी कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला मुख्याध्यापक स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविका कांबळे व सुरेखा शेळके यांनी केले.