Pune News : पुणे : अमेरिकेतील नासा या संशोधन संस्थेकडून पुण्यातील १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने बनविलेल्या प्रकल्पाची‘क्यूब्स इन स्पेस’प्रोग्रामसाठी थेट निवड झाली आहे. या यशामुळे रोहन भंसाळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नासाच्या ‘क्यूब्स इन स्पेस’ या कार्यक्रमात जगभरातील ११ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लघु उपग्रहाची रचना, निर्मिती साठी करण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्यानुसार रोहनने त्याचा प्रकल्प सादर केला. (Pune News) रोहन आणि त्याची आई डॉ. कविता भंसाळी यांनी प्रकल्पाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
विद्या व्हॅली शाळेचा विद्यार्थी
रोहन हा विद्या व्हॅली शाळेत सहावीत शिकत आहे. रोहनने या प्रकल्पाद्वारे अंतराळ उड्डाणात मानव, वस्तू आणि पेलोड्सचे उच्च तीव्रतेच्या सौर अतिनील विकिरणांपासून संरक्षण करण्यातील अडथळ्यांचा अभ्यास करण्यासाठीचा प्रकल्प तयार केला आहे.
दरम्यान, या प्रकल्पात ४ बाय ४ सेमी क्यूबमध्ये ४ यु.वी सेन्सर्स, ३ निवडक साहित्य (रेशीम, अॅल्युमिनियम, प्लास्टिक) आणि स्ट्रॅटोस्फियरमध्ये बारा तासांच्या प्रवासाच्या प्रत्येक ५ मिनिटांनी डेटा लॉग करण्यासाठी एक मायक्रोप्रोसेसर आहे. स्ट्रॅटोस्फिअर वातावरणातील १ लाख ६४ हजार फूट उंचीवर असतो. (Pune News) तर विमाने सर्वसाधारणपणे तीस हजार फूट उंचीवरून उडतात.
याबाबत रोहन म्हणाला की, मला विज्ञानाची आवड असल्याने या प्रकल्पात सहभागी होण्याचे ठरवले. तसेच शाळा आणि पालकांनीही प्रोत्साहन दिले. (Pune News) मला विज्ञानातील नवनव्या संकल्पना समजून घ्यायला आवडतात. त्यामुळे तीन ते चार महिने अभ्यास करून उपकरण तयार केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने केले दोघांचे फोटो व्हायरल ; पुण्यातील घटना..
Pune News : छगन भुजबळ धमकी प्रकरणात नवीन ट्विस्ट; तरुणाला केलेली अटक बेकायदा!