राजेंद्र कुमार शेळके
Pune पुणे : पिरंगुट तालुका मुळशी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात आनंदोत्सव-२०२३ मोठ्या उत्साहात साजरा झाला. ही माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी पुणे प्राईम न्यूजशी बोलताना दिली.
प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते डॉ. संजीव कुमार पाटील उपस्थित…!
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमात शिव किल्ले प्रेमी मारुती गोळे व प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते डॉ. संजीव कुमार पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, उप सचिव एल. एम. पवार, खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, सहसचिव प्रशासन ए.एम.जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी भौतिकशास्त्र तज्ञ डॉ. सतीश एकार, दिपक सरडे, सरपंच बाळासाहेब गोळे पाटील, लिवोनी कंपनीचे व्यवस्थापक मंदार सर, प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी, उप प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, डॉ. प्रविण चोळके, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनिल मरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक,सामाजिक व खेळात विशेष नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
गोळे यांनी गड किल्ले त्याचे महत्त्व व गरुड झेप मोहिमेचा परिचय करून देत मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास उलगडून दाखविला. अभिनेते डॉ. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थी जीवनातील स्वप्न,ध्येय,उद्दिष्ट, संधी याविषयी अतिशय मार्मिकपणे भाष्य केले.
प्रा.अविनाश हुंबरे यांनी कराओके संगीतावर जुनी गाणी सादर करून पुन्हा एकदा जुन्या गाण्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रतीक्षा गोळे, प्रियंका मारणे व विद्यार्थी प्रवीण इंगळे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रीकांत देशमुख व डॉ. रेखा जोशी यांनी केले.