लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक डॉ. राजेश जाधव यांचा अविष्कार अचिवर्स सर्वात्कृष्ट संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सोलापूर येथील अविष्कार फाऊंडेशनच्यावतीने सोलापूरतर्फे अविष्कार अचिवर्स पुरस्कार राष्ट्राच्या उभारणीतील सर्वात्कृष्ट संशोधक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत प्राध्यापक डॉ. राजेश जाधव यांना पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. राजेश जाधव यांनी कोरोना काळात प्राणवायुसाठीचे उपयुक्त संशोधन केली आहे.
दरम्यान, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसिचव डॉ. महेश चोपडे यांनी डॉ. राजेश जाधव यांचे विशेष अभिनंदन केले आहे.