पुणे : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील पावणेदोन लाख प्राथमिक शिक्षक आज (25 सप्टेंबर) रोजी एका दिवसासाठी सामुहीक रजा आंदोलनावर जाणार आहेत. जवळजवळ राज्यातील 40 हजार शाळा आज बंद राहणार आहेत.
आज राज्यातील जवळपास 40 हजार शाळा बंद राहणार आहेत. याआधी नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीची निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता सर्व राज्यातील शिक्षक संघटनांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला. परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
ज्या शाळांमध्ये मुलांची संख्या कमी आहे, त्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती करणे विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारे प्रशासकीय कामे या सगळ्या मुद्द्यांना विरोध करण्यासाठी आज शिक्षक हे आंदोलन करणार आहेत. आणि या आंदोलनामुळेच राज्यातील अनेक शाळा आज बंदर राहणार आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हाट्सअप ग्रुप लेफ्ट होणे, तसेच काळी फीत लावून काम करणे. अशा प्रकारचे विरोध दाखवण्यात आले होते. परंतु याचा काही परिणाम न झाल्याने आता पुन्हा एकदा शिक्षकांनी एका दिवसाची रजा घेऊन आंदोलन पुकारले आहे.
शिक्षक संघटनातर्फे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील काही ठिकाणी शाळा बंद राहणार आहेत.