लहू चव्हाण
पाचगणी : प्राथमिक शिक्षण हाच शिक्षणाचा मूळ गाभा आहे. आज डिजिटल क्रांती व संगणकयुक्त तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगात लहान वयातच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा कुशल वापर करून घेतला पाहिजे. तरच विद्यार्थी हा शैक्षणिक दृष्टया सक्षम होणार आहेत. असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर स्वाती हेरकळ यांनी केलं.
रोटरी क्लब पाचगणी व रोटरी क्लब नॉर्थ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात शालेय विद्यार्थ्यांना टॅब वितरण प्रसंगी हेरकळ बोलत होत्या.यावेळी रोटरी नॉर्थ पूणे चे अध्यक्ष गिरीश कोणकर, केतन जोशी, पाचगणी रोटरी अध्यक्ष भूषण बोधे, सेक्रेटरी स्वप्नील परदेशी, खजिनदार नितीन कासूर्डे, रोटरीयन किरण पवार, सुनील बगाडे, नितीन भिलारे, अशोक पाटील, अमित बोधे, अमोल माने, राजेंद्र भगत, प्रशांत मोरे, अमीन हाजी, विनिता चंद्रिकाप्रसाद, संजय आंब्राळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
हेळकर पुढे म्हणाल्या, शैक्षणिक टॅब मुळे विद्यार्थ्यांचे पाठीवरील दप्तराचे ओझ कमी होऊन शैक्षणिक नवनिर्मितीच्या निमित्ताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन जयवंत भिलारे यांनी केले तर आभार स्वप्नील परदेशी यांनी मानले.