उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयास एम.ए. इतिहास, एम. ए. मराठी व एम. कॉम हे अभ्यासक्रम सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
एम.ए. इतिहास, एम. ए. मराठी व एम. कॉम विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी (ता. १२) जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रवेश प्रक्रिया विद्यालयात सुरु करण्यात आली असून या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्याची संधी राज्यातील विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यामुळे हे एक नवीन दालन विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे अत्याधुनिक सोयी सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन यांनी केले आहे. महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (NACC) तर्फे मूल्यांकन होऊन ‘ B’ ग्रेड प्राप्त झाली आहे.