लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज पांचगणी येथे हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त ‘शब्दशिल्प’ या भित्तीपत्रिकेचे आयोजन करण्यात आले होते. या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रा.सुधाकर शिंदे यांच्या शुभहस्ते व प्राचार्य डॉ. सतिश देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्त ‘हिंदी भाषा व रोजगाराच्या संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध उपक्रमांचे आयोजन
यावेळी प्रमुख वक्ते प्रा.सुधाकर शिंदे (गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर) यांनी हिंदी भाषेचे देशपातळीवरील महत्त्व व प्रशासकीय, व्यावसायिक स्वरूप विषद करुन रोजगाराच्या संधी सांगितल्या. (Pachgani News) यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सतिश देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये हिंदी भाषेतील प्रशासकीय महत्व सांगून भाषेतील गोडवा सांगितला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी विभागप्रमुख प्रा. नरेंद्र फडतरे व सूत्रसंचालन डॉ. सुनील खोत यांनी केले. या कार्यक्रमात प्राध्यापिका अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले. (Pachgani News) कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणीतील कबड्डी स्पर्धेत २५ संघांचा सहभाग
Pachgani News : पसरणी घाटात दरड कोसळून दगड, माती रस्त्यावर; वाहतुकीची कोंडी