युनूस तांबोळी
शिरूर : मराठी राजभाषा म्हणून नुसता गौरव होणे पुरेसे नसून शैक्षणिक, राजकीय, संस्कृतिक व इतरही क्षेत्रात मराठीचा वापर जास्तीत जास्त करणे हे आपले कर्तव्य आहे. याकरिता आपण आपल्या मुलांना मराठीच्या वाचनाची गोडी लावणे ही गरजेचे आहे. त्या पाठोपाठ
मराठी लिखाणावर भर देऊन व्यवहारात तिचा वापर वाढविण्याची गरज आहे. असे मत महागणपती ग्रुप ऑफ स्कूल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शिवाजी शेळके यांनी व्यक्त केले.
रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील महागणपती ग्रुप ऑफ स्कूल मध्ये आज मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य अरविंद गोळे, अबिदा आत्तार, वंदना खेडकर, सोनाली नलावडे, पद्मिनी कवठेकर,
स्मिता गोळे, निलेश फाफाळे , मच्छिंद्र खैरनार, स्वाती दंडवते, प्रियंका पवार, तृप्ती शेळके, ज्योती साबळे, वि. भा. कळसकर, राणी वाळके, कांचन खेडकर, योगिता जाधव, मोनाली कल्लापुरे, जयश्री तंगड, सुरेखा लाड, प्रविण काळे, आब्बास शेख, शहेनाज शेख,
प्रियंका साठे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
शेळके म्हणाले की, मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून महाराष्ट्रातील सर्वांची मायबोली मराठी आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला
मराठी गौरव दिन असेही म्हटले जाते. मराठी भाषेत खूप सारे साहित्य वाचायला मिळतील. शालेय जीवनापासूनच त्यांना मराठी भाषेची आवड निर्माण करून त्याची गोडी लावणे गरजेचे आहे, असे शेळके यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनाली नलावडे यांनी केले. आभार स्मिता गोळे यांनी मानले.