राहुलकुमार अवचट
यवत : यवत येथील महालक्ष्मी विद्या प्रतिष्ठाण, संचलित किलबिल बालक मंदिर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंदमेळ्याचे उद्घाटन संस्थेच्या संस्थापिका सुनिता संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन शिक्षक दिलीप झिटे, क्रांतीबेन शहा, सामाजिक कार्यकर्त्या शितल दोरगे, प्री-प्रायमरीचे मुख्याध्यापक सौरभ जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्व स्टॉलधारकांचा सन्मान करत आनंदमेळ्यास सुरुवात करण्यात आली.
महालक्ष्मी विद्या प्रतिष्ठान संचलित किलबिल बालक मंदिर सेमी इंग्लिश, प्री प्रायमरी व इंग्लिश मीडियम स्कुल या शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सुवर्णा कैलास दौंड यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रत्येक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन स्वयंपूर्ण करणे, जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोर जाण्यासाठी सक्षम बनवणे, स्वतःचा विकासासोबत राष्ट्र विकास करणारे नवीन सक्षम पिढी निर्माण करणे ही विचारधारा घेऊनच संस्थापिका सविता संजय जगताप यांनी संस्थेची १३ वर्षांपूर्वी स्थापना केली, असे सुनीता जगताप यांनी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांची अंगीभुत गुण ओळखून त्यांच्यातील सप्तगुणांचा विकास करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक, शारीरिक, मानसिक विकास करणे ही शाळेची उद्दिष्ट असुन कृतियुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा विकास होत असतो. विद्यार्थी जेव्हा मैदानावर खेळतात तेव्हाच त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकास होत असतो.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात . शैक्षणिक सहल, किलबिल आनंद उत्सव आणि वार्षिक क्रीडा महोत्सव हे उत्सव म्हणजेच विद्यार्थ्यांचा आनंददायी शिक्षणातील एक उत्तम पर्वणी असते.
विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी या आनंदमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खाद्यपदार्थ, घरगुती वस्तु, विविध प्रकारची रोपे यांसह अनेक गोष्टीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. हा आनंदमेळा शनिवार दि ०७ व रविवार दि ०८ जानेवारी हे २ दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ०८ पर्यंत शासकिय विश्रामगृह यवत जवळ असलेल्या संस्थेच्या किलबिल बालक मंदिर येथे असुन यवत व परिसरातील नागरिकांनी, पालकांनी आपल्या मित्र – मैत्रिणींसह उपस्थित राहावे आवाहन शिक्षिका सारिका देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे कुलदिप जगताप , शिक्षिका वनिता वानखेडे, प्रियंका बच्छाव, काजल चव्हाण ,ऍक्सिस बँकेचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.