लोणी काळभोर, (पुणे) : येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल, ज्युनिअर व व्होकेशनल कॉलेज येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत व्याख्यान व देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंचायत समिती हवेलीचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य सिताराम गवळी यांनी प्रास्ताविकात स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या देशभक्तांचे स्मरण केले. विद्यार्थ्यांच्यात देशभक्तीचे मूल्य रुजवले. तर कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते कुमदाळे यांनी सन १८५७ ते १९४७ पर्यंत स्वातंत्र्याचा इतिहास व देशभक्तांचे योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडले.
यावेळी विस्तार अधिकारी भरत इंदलकर, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, माजी पंचायत समिती उपसभापती युगंधर उर्फ सनी काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, माजी सरपंच संगिता काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, ज्योती काळभोर, ग्रामपंचायत सदस्य संगीता लांडगे, गणेश कांबळे, मुख्याध्यापिका शेवाळे मॅडम, सोळंके मॅडम, सोरटे मॅडम, नेवसे मॅडम, उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय मनोगतामध्ये राजेसाहेब लोंढे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत देशभक्ती आणि देशसेवा कशी असावी हे उदाहरणासहित सांगितले. सरपंच माधुरी काळभोर यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पृथ्वीराज कपूर ज्युनियर कॉलेज, पृथ्वीराज कपूर हायस्कूल, इंग्लिश मिडीयम हायस्कूल, जिल्हापरिषद शाळा लोणी काळभोर मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग घेतला व देशभक्तीचा जागर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानराव सर, आभार बोरकर मॅडम यांनी मानले.