सागर जगदाळे
भिगवण : इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविदयालय, स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला ग्रुप ऑफ इंन्स्टीटयुशन्स, आसाम मधील रंगापारा महाविदयालय व सोलापूर येथील ग्लोबल फाउंडेशन यांचे संयुक्त विदयमाने ऑनलाईन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रांमध्ये देशातील सर्व राज्यांबरोबरच परदेशातूनही तज्ञ मार्गदर्शक व संशोधक विदयार्थी सहभागी होणार असल्याची माहीती येथील कला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज व चर्चासत्राचे संयोजक डॉ. प्रशांत चवरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र व आसाम येथील महाविदयालयांनी एकत्र येत ‘Recent Advances in Humanities,Commerce, Management, Science and Technology’ या विषय़ावर ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन मंगळवारी (ता. २०) सकाळी दहा वाजता राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात येणार आहे. तर अमेरिकेतील डॉ. महेश शेवाळे प्रमुख मार्गदर्शक असतील तर दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
चर्चासत्रामध्ये अमेरिकेतील सॅलिसबरी विदयापीठातील डॉ. प्रवीण सप्तर्षी, मुंबई विदयापीठातील डॉ. शिवाजी सरगर, पुणे येथील राजीव बिझनेस स्कुलचे संचालक प्रा. नितीन झावरे, आसाम येथील तेजपुर विदयापीठातील प्रा. उत्पल शर्मा तज्ञ मार्गदर्शक म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत तर सोलापुर विदयापिठातील डॉ. अरविंद दळवी, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे इंग्रजी विषय अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. शरद गाडेकर, माळेगाव येथील शिवनगर विदया प्रसारक मंडळाचे व्यवस्थापन महाविदयालयातील प्रा. डॉ. अविनाश गानबोटे, इंदापुर महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे चर्चासत्राचे अध्यक्ष स्थान भुषविणार आहे. चर्चासत्राच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी आसाम येथील रंगापारा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ.चारु सहारिया असतील. चर्चा सत्रामध्ये देशासह परदेशातील प्राध्यापक, संशोधक विदयार्थी सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या चर्चासत्राचे नियोजन कला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला ग्रुप ऑफ इंन्स्टीटयुशन्सचे प्राचार्य ए.ए. केस्ते, आसाम येथील रंगापारा महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. रंजन कलिता, संयोजन डॉ. प्रशांत चवरे, डॉ. शरद कर्णे, डॉ. रानेंद्र डेका व डॉ संतोष माने व तीनही महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी केले आहे.