राहुलकुमार अवचट
यवत- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त यवत (ता. दौंड) येथे राष्ट्रगीत गायन आज (बुधवारी) सकाळी ११ वाजता संपन्न झाले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्राकडून देशाला आज अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. राज्यात समूह राष्ट्रगीत गायन झाले आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमा’त सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या आवाहनाला यवतकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
अमृत महोत्सवानिमित्त यवत येथे विद्यालयाच्या प्रणांगणात सकाळी ११ वा . समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ ,शाळा क्र.२ व विद्या विकास मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे वंदे मातरम, भारतमाता कि जय, जय जवान जय किसान घोषणा देत सहभाग घेतला. यावेळी यवत सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव ,ग्रामपंचायत सदस्य , विद्यालय व प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.