उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ‘कला उत्सव स्पर्धा’ शनिवारी (ता.३) मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
‘कला उत्सव स्पर्धा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश अडसूळ यांनी केले. या कार्यक्रमास IQAC समन्वयक प्रा.नंदकिशोर मेटे, वाणिज्य विभाग प्रमुख सुजाता गायकवाड प्रा. विजय कानकाटे, प्रा. नवनाथ कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.रमेश अडसूळ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले पाहिजे. या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना चालना मिळेल. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळत आहे. यामुळे भविष्या काळात यामधूनच नवीन व्यावसायिक तयार होतील.
दरम्यान, कला उत्सव या स्पर्धेचे ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सेव्ह द गर्ल, गणपती बाप्पा मोरया, आजादी का अमृत महोत्सव, भारत माता कि जय, या रांगोळ्या स्पर्धेच्या आकर्षक ठरल्या आहेत. या उपक्रमाचे परीक्षण डॉ.समीर आबनावे , प्रा . वैशाली चौधरी ग्रंथपाल प्रा. सौरभ साबळे यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स्पर्धेच्या समन्वयक प्रा. शुभांगी रानवडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रा. रोहित बारवकर, प्रा. संतोष पवार, प्रा. अनुजा झाटे , प्रा. स्वाती मासाळकर , प्रा. सारिका डोणगे प्रा. दिपाली चौधरी ,प्रा. नंदिनी सोनवणे , प्रा. निलजा देशमुख , प्रा. रोहिणी शिंदे प्रा. अंजली शिंदे , प्रा. कमरुन्निसा शेख, प्रा. आप्पासाहेब जगदाळे , प्रा. भाऊसो तोरवे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी दीप राजपूत , विशाल महाडिक व प्राध्यापक वर्ग, व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप्रिता भोर यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. अमोल बोत्रे यांनी मानले.