उरुळी कांचन (पुणे) : राजमाता जिजाऊ व शिक्षण ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा प्रिंट यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा -२०२२ मध्ये उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेतील इयत्ता नववी- ड मधील विद्यार्थिनी निशा गोपीनाथ कुदळे हिने राज्यस्तरावर पाचवा क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भोसले यांनी दिली.
शिक्षक व विद्यार्थी सन्मान सोहळा हा भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी रविवारी (ता.२०) मोठ्या उत्साहात पार पडला.
हि स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, कलाशिक्षक मनियार सर यांनी स्पर्धेचे संयोजन केले. यावेळी यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थापाक अध्यक्ष व इतर पदाधिकारी तसेच मुख्याध्यापकांनी कौतुक केले.