Mumbai News : मुंबई : आता बालवाडी, नर्सरी सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे बालवाडी, नर्सरी चालकांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. (Henceforth, the permission of the education department will have to be taken to start kindergartens and nurseries)
अनेक तक्रारी आल्याने शासनाने घेतला निर्णय
दीपक केसरकर म्हणाले की, नर्सरी-बालवाडी सुरु करताना कुणीही नियम पाळत नाहीत, कोणीही खोली भाड्याने घेऊन नर्सरी सुरु करतात, याला आळा बसण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. (Mumbai News ) प्राथमिक शिक्षणात मुलाचा पाया घडतो. त्यामुळे प्राथमिक शिक्षण दर्जदार, आणि सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.
सध्या अनेक ठिकाणी बालवाडी, नर्सरी सुरु करण्याचे पेव फुटले आहे. राज्यात अनेक ठिकाणच्या नर्सरी या अनाधिकृत असल्याचा तक्रारी सामाजिक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केल्या आहेत. (Mumbai News )नर्सरी- केजीच्या नावाखाली पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जात आहे. पालकांकडून पैसा घेतल्यानंतरदेखील गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात नसल्याचे प्रकाश उघडकीस आले आहेत. यावर कुणाचेही नियंत्रण नव्हते. परंतु आता या शाळा अशाच मनमानी पद्धतीने चालवता येणार नाही. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता या शाळा सुरु करतांना शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असणार असून, शिक्षण विभागाचे नियंत्रण या शाळांवर असणार आहे.या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी आता बालवाडी, नर्सरी सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे.