लोणी काळभोर (पुणे ) : एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स अँड रिसर्च पुणे येथील बीटेक तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आर्य पदुरे आणि इंटिग्रेटेड एमटेक तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी सब्यसाची बॅनर्जी यांनी आंतरराष्ट्रीय जनेटिक्ल आभियांत्रिकी मशीन फाउंडेशन (iGem)च्या सिंथेटिक बायोलॉजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे.
चार विद्यार्थ्यांच्या संघात एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्सेस अँड रिसर्च च्या २ विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच या संघाने स्पर्धेचे उपविजेते पद आणि “बेस्ट डॉक्युमेंटेशन आणि ट्रबलशूटिंग” पुरस्कार जिंकला. इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशीन (iGEM) फाउंडेशन ही सिंथेटिक बायोलॉजी, शिक्षण आणि स्पर्धेच्या प्रगतीसाठी काम करणारी संस्था आहे.
डॉ. रेणू व्यास म्हणाले, पदवी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी IGEM फाउंडेशन या स्पर्धा, वार्षिक, जागतिक सिंथेटिक बायोलॉजी इव्हेंट, आयोजित करत असते. जगासमोरील दैनंदिन समस्यांना सामोरे जाऊन कृत्रिम जीवशास्त्राच्या मदतीने उपया सोधण्याची संधी उपलब्ध करून देते. भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट्समध्ये ९०% नुकसान झाल्याचे चित्र आहे.
आयुर्वेदाचे अविश्वसनीय आरोग्य फायद्यांबद्दल जागरूकता नाही. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणाद्वारे वनस्पतींच्या अर्कांचे उत्पादन वाढविण्यासाठी जनुकीय सुधारित यीस्ट प्रणाली आणली आहे. गंभीरपणे धोक्यात असलेल्या वनस्पतींमध्ये आढळलेल्या वैद्यकीयदृष्ट्या संबंधित दुय्यम चयापचयांच्या उत्पादनास गती देण्यासाठी सिंथेटिक प्लाझमिड वेक्टरची रूपरेषा तयार करण्यात आली आहे
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी बायोइंजिनियरिंगचे संचालक प्रा. विनायक घैसास आणि प्रिन्सिपल डॉ. रेणू व्यास यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि या अतुलनीय कामगिरीसाठी सर्व प्राध्यापकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.