लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटीचा विद्यार्थी विशेष अय्यरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान…!
भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते विशेष अय्यरला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एमआयटीच्या एमआयटी स्कूल ऑफ फिल्म आणि थियटरच्या अंतिम वर्षात शिकत असलेला विद्यार्थी विशेष अय्यर याच्या ग्रॅज्युएशन प्रोजेक्ट फिल्म ‘परीह’ला 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन-फीचर फिल्म श्रेणीतील पदार्पणातील सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा डॉ मंगेश कराड यांनी निर्माता म्हणून पुरस्कार स्वीकारला, तर विद्यार्थी विशेष अय्यर याने दिग्दर्शित केलेल्या परिह या चित्रपटाला नॉन-फीचर फिल्म श्रेणीतील पदार्पणातील सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक सन्मानित करण्यात आले.
विशेष अय्यरला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड, प्र-कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, एमआयटी-एडीटीयूचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. अमित त्यागी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.